रत्नागिरी : येथील श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, वैश्य युवा आणि इन्फिगो आय केयर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. श्री राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर होईल.
शिबिरात मशीनद्वारे नेत्रतपासणी, पारंपरिक पद्धतीने नेत्र तपासणी, डोळ्यांच्या प्रेशरची तपासणी, नजरेबाबत सुयोग्य मार्गदर्शन या प्रकारच्या तपासण्या संपूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.
या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री राधाकृष्ण वैश्य संस्थेचे अध्यक्ष राजन मलुष्टे, इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकुरदेसाई, वैश्य युवाचे सुमित संसारे, केतन शेट्ये, सचिन केसरकर, अनिश खातू यांनी केले आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने मास्क लावून येणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे.

