स्नेहल पावरी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार

रत्नागिरी : मुंबईतील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातून सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका आणि 58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग युनिटमधील फर्स्ट ऑफिसर (एनएनसी) सौ. स्नेहल संतोष पावरी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२० जाहीर झाला आहे.

अकादमीतर्फे दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. त्यामध्ये अनेक विभागातील मान्यवरांचा समावेश असतो. यावर्षी सौ. पावरी यांना शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण २४ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार आहे.

सौ. पावरी पालशेत (गुहागर) येथील दर्यावर्दी प्रतिष्ठान महिला मंडळ या सामाजिक संस्थेच्या सचिव असताना महिलांसाठी अनेक पद्धतीने जनजागृतीचे काम करत आहेत. त्यांच्या सामाजिक व शैक्षिणक कामामुळे विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांनीही त्यांना आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा उल्लेखनीय शैक्षणिक कार्य पुरस्कार, जागतिक महिला दिनी – समाजभूषण पुरस्कार, यूनियन बैंक ऑफ़ इंडिया – स्टार परफॉरमन्स पुरस्कार, राष्ट्रसेविका समितीचा रत्नकोंदण पुरस्कार., अभाविपच्या तिरंगायात्रा समारोप कार्यक्रमात कर्तृत्ववान नारी पुरस्कार, मुंबई खारवी समाज सेवा मंडळातर्फे विशेष शैक्षणिक कार्य सन्मान, जिल्हा माध्यमिक अध्यापक संघातर्फे विशेष शैक्षणिक कार्य सन्मान, रत्नागिरी तालुका खारवी समाज विकास समितीतर्फे विशेष शैक्षणिक कार्य सन्मान, रत्नागिरी पालिकेतर्फे महिला दिनी आदर्श महिला पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. एनसीसी अधिकारी म्हणूनही अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply