रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आगामी पाच वर्षांसाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी पांडुरंग दाभोळकर यांची निवड झाली. संस्थेचे कार्यक्षेत्र आता महाराष्ट्र राज्य असे करण्यात आले आहे.
सभेत अध्यक्षांबरोबरच उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व खजिनदारांची निवड करण्यात आली. गेली २१ वर्षे संस्थेसाठी अहोरात्र कार्य करणारे पांडुरंग दाभोळकर यांच्यावर पुन्हा एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. बिनविरोध निवडलेले इतर पदाधिकारी असे – गुरुनाथ जाक्कर उपाध्यक्ष, दिनेश जाक्कर सचिव, प्रवीण बेंदरकर सहसचिव, खजिनदार संतोष आगडे. संचालक मंडळातील इतर सदस्य असे – भगवान शंकर पाटील, संतोष जनार्दन पावरी, नीलेश शंकर पाटील, भिकाजी धोंडू पालशेतकर, सुरेश गौरू पालशेतकर, वसंत तुकाराम पाटील, लक्ष्मण सखाराम पटेकर, सौ. स्नेहल संतोष पावरी, सौ. मेघा नीलेश पाटील, सौ. गुंतता गुरुनाथ जाक्कर.
वीस वर्षांपूर्वी २००१ पासून गुहागर तालुक्यातील पालशेत पंचक्रोशी परिसरात कार्यरत असणाऱ्या या संस्थेचे कार्यक्षेत्र आता विस्तारित करून ते महाराष्ट्र राज्य असे करण्यात आले आहे. आगामी पाच वर्षांच्या कालावधीत बहुउद्देशीय इमारत आणि सुसज्ज क्रीडांगण निर्मितीचा संकल्प सोडण्यात आला आहे.

