रत्नागिरीत ८, तर सिंधुदुर्गात २१ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दोन नोव्हेंबर) आठ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८४६७ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २१ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४९३५ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (दोन नोव्हेंबर) १३ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७९१४ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९३.४६ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे आठ रुग्ण आढळले आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – रत्नागिरी ४ (एकूण ४). रॅपिड अँटिजेन टेस्ट – चिपळूण २, रत्नागिरी १, लांजा १ (एकूण ४) (दोन्ही मिळून ८)

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८४६७ झाली आहे. बाधितांचा दर १४.७३ टक्के आहे. सध्या १२५ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंत ३१६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.७३ टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८७, खेड ५०, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७४, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (दोन नोव्हेंबर) २१ व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४९३५ झाली आहे. आज १६ जण करोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ४३१८ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज वेंगुर्ला येथील ६५ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १२७ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply