सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (३० एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १० हजार २७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात दोन हजार ११३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३०० जणांचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक आहे. आज ७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.
आजच्या ३०० नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १२ हजार ४७२ झाली आहे. आजच्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ५८, दोडामार्ग – १३, कणकवली – ६४, कुडाळ – ५३, मालवण – ४२, सावंतवाडी – ३३, वैभववाडी – १८, वेंगुर्ले १८, जिल्ह्याबाहेरील १.
जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची आजची संख्या दोन हजार ११३ आहे. सर्वाधिक ४३३ सक्रिय रुग्ण कणकवली तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड २५९, दोडामार्ग ९५, कुडाळ ३५६, मालवण ३५८, सावंतवाडी २२८, वैभववाडी १७७, वेंगुर्ले १५४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ५३. सक्रिय रुग्णांपैकी २९६ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी २६३ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज ७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३२६ झाली आहे. आज देवगड आणि कणकवली तालुक्यात प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला.
Follow Kokan Media on Social Media



