सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे ५४३ करोनाबाधित रुग्ण, ११ जणांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१ मे) दुपारी १२ वाजेपर्यंत नवे ५४३ आणि ४० दुबार तपासणी केलेले असे एकूण ५८३ करोनाबाधित रुग्ण आढळले. आज ११ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात दोन हजार ५९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या ५४३ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १३ हजार १५ झाली आहे. आजच्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ४५, दोडामार्ग – ४१, कणकवली – १११, कुडाळ – १२१, मालवण – ७१, सावंतवाडी – ७६, वैभववाडी – ३४, वेंगुर्ले ४२, जिल्ह्याबाहेरील २.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची आजची संख्या दोन हजार ५९६ आहे. सर्वाधिक ५३२ सक्रिय रुग्ण कणकवली तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड २९२, दोडामार्ग १३३, कुडाळ ४७०, मालवण ४२२, सावंतवाडी २९२, वैभववाडी २०७, वेंगुर्ले १९४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ५४. सक्रिय रुग्णांपैकी ३१० रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी २७६ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३३७ झाली आहे. आज सर्वाधिक कणकवली आणि कुडाळ तालुक्यात प्रत्येकी ३ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ८३ मृत्यू कणकवली तालुक्यात झाले आहेत. इतर तालुक्यांमधील तालुकानिहाय मृत्यूची आजपर्यंतची एकूण संख्या अशी – देवगड ३४, दोडामार्ग – ९, कुडाळ – ५१, मालवण – ४२, सावंतवाडी – ६०, वैभववाडी – ३४, वेंगुर्ले – २२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply