रत्नागिरीत नवे ५२० करोनाबाधित रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१ मे) ५२० नवे करोनाबाधित आढळले. आज ५ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. आज ७७१ रुग्ण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यात आज सर्व नऊ तालुक्यांमध्ये करोनाबाधित आढळले. सर्वाधिक १४० रुग्ण रत्नागिरी तालुक्यात सापडले.

जिल्ह्यात सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ८९, दापोली ५०, खेड ५८, गुहागर ६, चिपळूण ५०, संगमेश्वर १४, मंडणगड ११, लांजा २३, राजापूर २. (एकूण ३०३). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ५१, दापोली १७, खेड १५, गुहागर २८, चिपळूण ४६, संगमेश्वर ४७, लांजा ८ आणि राजापूर ५. (एकूण २१७). (दोन्ही मिळून ५८८). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २२ हजार ८०३ झाली आहे.

जिल्ह्यात आज ७७१ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या १५ हजार ६३५ झाली आहे.

जिल्ह्यात आज पूर्वीचा १ आणि आजचे ४ अशा एकूण ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आजचे चारही मृत्यू शासकीय रुग्णालयांत झाले. या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ६६१ झाली असून मृत्युदर २.८९ टक्के आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय एकूण मृत्यू असे – रत्नागिरी १६९, खेड ८२, गुहागर २८, दापोली ६३, चिपळूण १३३, संगमेश्वर ९६, लांजा ३५, राजापूर ४८, मंडणगड ७.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply