सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५०७५ सक्रिय करोनाबाधित रुग्ण

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१५ मे) दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तासांत ४०७, तर एकूण १४ हजार १३९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या जिल्ह्यात ५ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४३२ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

पुन्हा तपासणी केलेल्या ६ रुग्णांसह आजच्या रुग्णांची एकूण संख्या ४३२ आहे. आजच्या नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १९ हजार ६९७ झाली आहे. आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ४६, दोडामार्ग – २८, कणकवली – ७४, कुडाळ – ७०, मालवण – ७०, सावंतवाडी – ७०, वैभववाडी – ११, वेंगुर्ले – ५५, जिल्ह्याबाहेरील – २.

जिल्ह्यात सर्वाधिक ९२५ सक्रिय रुग्ण कुडाळ तालुक्यात, तर त्याखालोखाल ८५६ रुग्ण सावंतवाडी तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ७७७, दोडामार्ग ३४९, कणकवली ७०१, मालवण ७१७, वैभववाडी १३५, वेंगुर्ले ५९०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २५. सक्रिय रुग्णांपैकी ३४० रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी ३०० रुग्ण ऑक्सिजनवर तर ४० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात १६ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ४७७ झाली आहे. आजच्या मृतांचा तपशील असा – देवगड १, दोडामार्ग १, कणकवली २, कु़डाळ ३, मालवण ३, सावंतवाडी ४, वेंगुर्ले २.

जिल्ह्यातील तालुकानिहाय मृत्यूची आजपर्यंतची एकूण संख्या अशी – देवगड ५५, दोडामार्ग – १५, कणकवली – १०१, कुडाळ – ७५, मालवण – ६५, सावंतवाडी – ८९, वैभववाडी – ४०, वेंगुर्ले – ३५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.
…………

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply