Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढतीच

Advertisements

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१३ मे) दुपारी १२ वाजेपर्यंत नवे ६०३ करोनाबाधित आढळले, तर आज बरे झालेले ७४६ रुग्ण घरी गेले. त्यामुळे नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असली, तरी नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिकच आहे. आज १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १३ हजार ७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात ५ हजार ३८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

पुन्हा तपासणी केलेल्या २६ रुग्णांसह आजच्या रुग्णांची एकूण संख्या ६२९ आहे. आजच्या नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १८ हजार ८४२ झाली आहे. आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ७७, दोडामार्ग – ७१, कणकवली – ६८, कुडाळ – १२८, मालवण – ७१, सावंतवाडी – १२४, वैभववाडी – ९, वेंगुर्ले – ५३, जिल्ह्याबाहेरील – २.

जिल्ह्यात सर्वाधिक ९९५ सक्रिय रुग्ण कुडाळ तालुक्यात, तर त्याखालोखाल ८४८ रुग्ण सावंतवाडी तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – दोडामार्ग ४३८, कणकवली ७१९, मालवण ८१५, वैभववाडी १४७, वेंगुर्ले ५३४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ६०. सक्रिय रुग्णांपैकी ३१२ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी २७२ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात १२ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ४४७ झाली आहे. आजच्या मृतांचा तपशील असा – देवगड ३, दोडामार्ग २, कणकवली १, मालवण १, सावंतवाडी ३, वेंगुर्ले २.

जिल्ह्यातील तालुकानिहाय मृत्यूची आजपर्यंतची एकूण संख्या अशी – देवगड ५३, दोडामार्ग – १४, कणकवली – ९५, कुडाळ – ७१, मालवण – ६२, सावंतवाडी – ७८, वैभववाडी – ३९, वेंगुर्ले – ३३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version