सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे करोनाबाधित आणि बरे झालेले सारख्या पातळीवर

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (११ मे) दुपारी १२ वाजेपर्यंत नवे ३४१ करोनाबाधित आढळले, तर आज बरे झालेले ३२१ रुग्ण घरी गेले. त्यामुळे नवे बाधित आणि बरे झालेले रुग्ण साधारण सारख्या पातळीवर आले आहेत. आज १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १२ हजार २९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात ५ हजार १२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या ३४१ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १७ हजार ५७५ झाली आहे. आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ४१, दोडामार्ग – २४, कणकवली – ४९, कुडाळ – ५९, मालवण – ७३, सावंतवाडी – ५५, वैभववाडी – ५, वेंगुर्ले ३३, जिल्ह्याबाहेरील – २.

जिल्ह्यात सर्वाधिक १००३ सक्रिय रुग्ण कुडाळ तालुक्यात, तर त्याखालोखाल ७७६ रुग्ण सावंतवाडी तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ७१३, दोडामार्ग ३८४, कणकवली ७००, मालवण ७९७, वैभववाडी १५१, वेंगुर्ले ५२८, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ६८. सक्रिय रुग्णांपैकी ३०१ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी २६१ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात १२ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ४२० झाली आहे. आज देवगड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात प्रत्येकी २, तर मालवण तालुक्यात ४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

जिल्ह्यातील तालुकानिहाय मृत्यूची आजपर्यंतची एकूण संख्या अशी – देवगड ४९, दोडामार्ग – १२, कणकवली – ९२, कुडाळ – ६८, मालवण – ५९, सावंतवाडी – ७१, वैभववाडी – ३९, वेंगुर्ले – २८, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply