Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ४६ हजारावर

Advertisements

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१७ जुलै) करोनाचे नवे २१० रुग्ण आढळले, तर १६६ रुग्ण करोनामुक्त झाले. आजपर्यंतच्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४६ हजार ४ झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत ४१ हजार ७४० रुग्ण करोनामुक्त झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १६६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज दुबार तपासणी केलेल्या तीन रुग्णांसह नवे २१० करोनाबाधित रुग्ण आढळले.

सध्या जिल्ह्यात ३ हजार ९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ४१, दोडामार्ग – २, कणकवली – ३२, कुडाळ – ३८, मालवण – २९, सावंतवाडी – ३०, वैभववाडी – १५, वेंगुर्ले – १७, जिल्ह्याबाहेरील ३.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४३६, दोडामार्ग ८५, कणकवली ५९९, कुडाळ ६९०, मालवण ५०१, सावंतवाडी ३६५, वैभववाडी १५०, वेंगुर्ले २५८, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १५. सक्रिय रुग्णांपैकी २०७ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज जिल्ह्यात आधीच्या ४ आणि आजच्या ४ अशा ८ रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार १६३ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – कणकवली ३, सावंतवाडी २, वैभववाडी १, वेंगुर्ले २.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १५३, दोडामार्ग – ३४, कणकवली – २३४, कुडाळ – १७७, मालवण – २४०, सावंतवाडी – १५६, वैभववाडी – ७०, वेंगुर्ले – ९३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version