सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४१ नवे करोनाबाधित; १४ जण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१८ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत दुबार तपासणी केलेल्या दोघांसह नवे ४१ करोनाबाधित आढळले, तर १४ रुग्ण करोनामुक्त झाले.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५१ हजार ३६७ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७, दोडामार्ग २, कणकवली ४, कुडाळ ५, मालवण ५, सावंतवाडी १०, वैभववाडी २, वेंगुर्ले ४. जिल्ह्यात सध्या १२९७ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ५० रुग्ण ऑक्सिजनवर, तर १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १६६, दोडामार्ग ४४, कणकवली २२७, कुडाळ ३२७, मालवण २३२, सावंतवाडी १५१, वैभववाडी ४६, वेंगुर्ले ८४, जिल्ह्याबाहेरील २०.

गिर्ये (देवगड), नाटळ आणि कणकवली (कणकवली) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा आज करोनामुळे मृत्यू झाला. या तिघांसह जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १३८८ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७३, दोडामार्ग – ३९, कणकवली – २८८, कुडाळ – २२६, मालवण – २७६, सावंतवाडी – १९१, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply