रत्नागिरीत आज विक्रमी २५९ जण करोनामुक्त; नवे ७१ रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १८ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार तब्बल २५९ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ७१ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७३ हजार ९०७ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी वाढून ती ९५.५९ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ७१ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १९९९ नमुन्यांपैकी १९६७ अहवाल निगेटिव्ह, तर ३२ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या २१७२ पैकी २१३३ अहवाल निगेटिव्ह, तर ३९ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७७ हजार ३१७ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख २३ हजार १५७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ८७३ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ५२७, तर लक्षणे असलेले ३४६ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४७३ आहे, तर ४०० जण संस्थात्मक विलगीकरणात असून १५१ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ५४, डीसीएचसीमधील १६४, तर डीसीएचमध्ये १८२ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ६२ जण ऑक्सिजनवर, ३६ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या एका आणि आजच्या ३ असा चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.१३ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०९ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.३४ आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३८६ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३५, दापोली २१४, खेड २१७, गुहागर १६६, चिपळूण ४६९, संगमेश्वर २०७, रत्नागिरी ७९५, लांजा १२४, राजापूर १५९. (एकूण २३८६).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply