सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद नाही

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१९ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत एकाही करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली नाही

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज नवे ३८ करोनाबाधित आढळले, तर ८ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५१ हजार ४०५ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड २, दोडामार्ग ४, कणकवली ५, कुडाळ ३, मालवण १०, सावंतवाडी ५, वैभववाडी २, वेंगुर्ले ६, जिल्ह्याबाहेरील १. जिल्ह्यात सध्या १३८८ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ४५ रुग्ण ऑक्सिजनवर, तर २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १६९, दोडामार्ग ४६, कणकवली २३०, कुडाळ ३३१, मालवण २३७, सावंतवाडी १५५, वैभववाडी ४८, वेंगुर्ले ९०, जिल्ह्याबाहेरील २१.

आज एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १३८८ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७३, दोडामार्ग – ३९, कणकवली – २८८, कुडाळ – २२६, मालवण – २७६, सावंतवाडी – १९१, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply