सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे ४७ बाधित, तर ५१ रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२३ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंत नवे ४७ करोनाबाधित रुग्ण आढळले, तर त्याहून ४ अधिक म्हणजे ५१ रुग्ण करोनामुक्त झाले, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५० हजार ४४२ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग ०, कणकवली १४, कुडाळ ७, मालवण १२, सावंतवाडी १०, वैभववाडी ३, वेंगुर्ले ०.

सक्रिय रुग्णांपैकी ७७ रुग्ण ऑक्सिजनवर तर १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड २१८, दोडामार्ग ४२, कणकवली ३२३, कुडाळ ४३५, मालवण २५०, सावंतवाडी २०४, वैभववाडी ६९, वेंगुर्ले १२१, जिल्ह्याबाहेरील १५.

आज जिल्ह्यात पडवे (ता. कुडाळ) येथील एका करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय याआधी मरण पावलेल्या २ रुग्णांची नोंदही आज झाली. त्यांचा तपशील असा – कुडाळ २, सावंतवाडी १. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ३२८ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६६, दोडामार्ग – ३६, कणकवली – २७५, कुडाळ – २१०, मालवण – २६६, सावंतवाडी – १८३, वैभववाडी – ८०, वेंगुर्ले – १०३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply