रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तीचा दर ९५ टक्क्यांवर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधित रुग्णांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक झाली आहे. त्यामुळे करोनामुक्तीचा दर ९५ टक्क्यांच्यावर गेला आहे. नवबाधितांची संख्याही १०० पेक्षा कमी आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आज (२३ ऑगस्ट) १९३ रुग्ण करोनामुक्त झाले. करोनामुक्तांची एकूण संख्या आता ७१ हजार ३७७ झाली असून ही टक्केवारी ९५.१२ आहे. जिल्ह्यात आज नवे ६५ करोनाबाधित आढळले असून त्यांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २८९१ नमुन्यांपैकी २८५९ अहवाल निगेटिव्ह, तर ३२ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या ६१६ पैकी ५८३ अहवाल निगेटिव्ह, तर ३३ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७५ हजार ३९ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ३३ हजार ५९० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज १३४१ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले १०४३, तर लक्षणे असलेले २९८ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ७२३ आहे. संस्थात्मक विलगीकरणात ६१८ रुग्ण असून ६३ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ३२०, डीसीएचसीमधील १२९, तर डीसीएचमध्ये १६९ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १३३ जण ऑक्सिजनवर, ६३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

कालच्या ४ आणि आजच्या ५ अशा एकूण ९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ३.६६ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०१ टक्के झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.६७ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २२५८ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या १८९२ (८३.७९ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ८०३ (३५.५६ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३४, दापोली १९६, खेड १९९, गुहागर १५९, चिपळूण ४४०, संगमेश्वर १९८, रत्नागिरी ७६५, लांजा ११९, राजापूर १४८. (एकूण २२५८).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply