सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातर्फे २४ ऑगस्ट रोजी “एमपीएससी”साठी फेसबुक लाइव्ह मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातर्फे २४ ऑगस्ट रोजी ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या संकल्पनेतून स्पर्धापरीक्षा मार्गदर्शनपर प्रेरणा या उपक्रमाचा प्रारंभ झाला आहे. गेल्या १८ ऑगस्ट रोजी त्यातील पहिले सत्रा पार पडले. त्यामध्ये फेसबुक लाइव्हद्वारे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आणि सहायक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा सहभागी झाल्य होत्या. त्याला तरुणांचा चांगला प्रतिसाद लाभला. त्यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी एमपीएससीसाठीही अशा स्वरूपाचे सत्र आयोजित करावे, अशी सूचना केली होती. त्यानुसार एमपीएससी परीक्षेबाबत मार्गदर्शन करणारे सत्र आयोजित करण्यात आले आहे.

हे दुसरे मार्गदर्शन सत्र मंगळवारी, २४ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामध्ये एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षेविषयी मार्गदर्शन केले जाईल. एमपीएससी परीक्षेचे स्वरूप, परीक्षेची तयारी कशी करावी, आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे, येणाऱ्या अडचणींमधून मार्ग कसा काढावा, याबाबतची माहिती दिली जाणार आहे. त्याबरोबरच विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न, शंकांचे निरसन केले जाणार आहे.

मंगळवारी, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हे मार्गदर्शन फेसबुक लाइव्हद्वारे केले जाणार आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा देवगडचे उपविभागीय अधिकारी सुधीर सुभाष पाटील, परिवीक्षाधीन तहसीलदार तथा परिचलन अधिकारी सुधीर बाजीराव पाटील सहभागी होणार आहेत.

या मार्गदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी सोबतच्या लिंकवर जावे.
https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-01061044850492

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply