Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा एक नवा रुग्ण, एक चिंताजनक, एक मृत्यू

hands with latex gloves holding a globe with a face mask

Photo by Anna Shvets on Pexels.com

Advertisements

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज एकच नवा रुग्ण आढळला. एक रुग्ण बरा होऊन घरी गेला, तर एका रुग्णाची करोनाविरुद्धची लढाई अयशस्वी ठरली.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. आज (२० डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या २२ असून आतापर्यंत ५१ हजार ७३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ५३ हजार २२३ रुग्ण बाधित आढळले, तर आतापर्यंत १ हजार ४६४ रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आज आढळलेला नवा रुग्ण आणि मरण पावलेला रुग्णही कणकवली तालुक्यातील आहे.

जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या २२ रुग्णांपैकी एक रुग्ण ऑक्सिजनवर आहे, तर एक रुग्ण चिंताजनक असल्याने व्हेंटिलेटरवर आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ३, दोडामार्ग ०, कणकवली ८, कुडाळ २, मालवण २, सावंतवाडी ५, वैभववाडी ०, वेंगुर्ले २, जिल्ह्याबाहेरील ०.

आज कासार्डे (ता. कणकवली) येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू नोंदविला गेल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४६४ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४४, कणकवली – ३००, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version