face mask on blue background

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा एकमेव नवा रुग्ण

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचा एकमेव नवा रुग्ण आढळला आहे. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

आज (१४ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात आज चार रुग्ण करोनामुक्त झाले. आज कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही, मात्र यापूर्वी मृत्यू झालेल्या तिघांची नोंद आज करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २८ असून आतापर्यंत ५१ हजार ७२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ५३ हजार २१७ रुग्ण बाधित आढळले, तर आतापर्यंत १ हजार ४६३ रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आज आढळलेला नवा रुग्ण सावंतवाडी तालुक्यातील आहे.

जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या २८ रुग्णांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही. एक रुग्ण चिंताजनक असल्याने व्हेंटिलेटरवर आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ४, दोडामार्ग ०, कणकवली ५, कुडाळ ४, मालवण ७, सावंतवाडी ५, वैभववाडी ०, वेंगुर्ले ३, जिल्ह्याबाहेरील ०.

आज सावंतवाडी तालुक्यातील तिघांचा मृत्यू नोंदविला गेल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४६३ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४४, कणकवली – २९९, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply