दापोली : हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन पावलेले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्यासह अन्य सैनिकांना आज बुधवारी, १५ डिसेंबर रोजी दापोली येथे नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
लष्करी ४३ वर्षे सेवा, तिन्ही लष्कर दलांचे पहिले प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे ८ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यामुळे देशाची मोठी हानी झाली आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सायंकाळी ५ वाजता दापोली पोलीस ठाण्याच्या आवारातील संचलन मैदानावर कार्यक्रम होणार आहे. या श्रद्धांजली कार्यक्रमाला दापोलीकरांनी उपस्थित राहून देशाच्या सर्वोच्च सैनिकांना आदरांजली वाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे. करोना नियमांचे पालन करून ही सभा होणार आहे. हा कार्यक्रम दापोलीतील पत्रकारांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे.
