Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे १४९ रुग्ण, एकाचा मृत्यू

pexels-photo-4031710.jpeg

Photo by Edward Jenner on Pexels.com

Advertisements

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे १४९ रुग्ण आढळले. तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली. आज ३६ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार आज (१७ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या तीन जणांसह एकूण १४९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या १,३३० झाली आहे. त्यापैकी ११ रुग्ण ऑक्सिजनवर असून ६ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत.

आतापर्यंत ५४ हजार ८२३ रुग्ण बाधित जिल्ह्यात आढळले., ५२ हजार २४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १ हजार ४६९ रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १८, दोडामार्ग ४, कणकवली १६, कुडाळ ३४, मालवण २७, सावंतवाडी ३२, वैभववाडी १, वेंगुर्ले १७, जिल्ह्याबाहेरील ०.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ९१, दोडामार्ग १४५, कणकवली २४३, कुडाळ ३२४, मालवण १६६, सावंतवाडी १७८, वैभववाडी ४६, वेंगुर्ले ११६, जिल्ह्याबाहेरील २१.

मु. पो. दाभोली (ता. वेंगुर्ले) येथील ७९ वर्षाच्या पुरुष रुग्णाचा आज मृत्यू झाला. या रुग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. हा मृत्यू नोंदविला गेल्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४६९ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८१, दोडामार्ग – ४५, कणकवली – ३००, कुडाळ – २४३, मालवण – २९०, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – ११२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version