सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१५ जानेवारी) करोनाचे नवे ११४ रुग्ण आढळले, तर ११६ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले.
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार आज (१५ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या २ जणांसह एकूण ११४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या ९९७ झाली आहे. त्यापैकी ९ रुग्ण ऑक्सिजनवर असून ५ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत.
आतापर्यंत ५१ हजार ९७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ५४ हजार ४३७ रुग्ण बाधित आढळले. आतापर्यंत १४६८ रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ५, दोडामार्ग २६, कणकवली १५, कुडाळ ३२, मालवण ९, सावंतवाडी १४, वैभववाडी २, वेंगुर्ले ८, जिल्ह्याबाहेरील ३.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ५८, दोडामार्ग १२७, कणकवली १९१, कुडाळ २३२, मालवण १२६, सावंतवाडी १३१, वैभववाडी ३४, वेंगुर्ले ८१, जिल्ह्याबाहेरील १७.
२४ तासांपूर्वी दोन नव्या रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४६८ झाली. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८१, दोडामार्ग – ४५, कणकवली – ३००, कुडाळ – २४३, मालवण – २९०, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड