सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे २०६ रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार ५२५ झाली आहे. एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली, तर आज ८४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले.
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार आज (दि. १९ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या सात जणांसह एकूण २०६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या रुग्णांपैकी १७ रुग्ण ऑक्सिजनवर असून ६ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात ५५ हजार १७५ रुग्ण बाधित आढळले, तर ५२ हजार १७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १ हजार ४७२ रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३, दोडामार्ग २२, कणकवली ३५, कुडाळ ५७, मालवण १९, सावंतवाडी ४७, वैभववाडी ६, वेंगुर्ले २२, जिल्ह्याबाहेरील १.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ७३, दोडामार्ग २०३, कणकवली २६४, कुडाळ ३९२, मालवण १४१, सावंतवाडी २३८, वैभववाडी ४९, वेंगुर्ले १४१, जिल्ह्याबाहेरील २४.
मु. पो. कुडाळ येथील ७८ वर्षाच्या महिला रुग्णाचा आज मृत्यू झाला. या रुग्णाला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. हा मृत्यू नोंदविला गेल्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४७२ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८१, दोडामार्ग – ४५, कणकवली – ३०१, कुडाळ – २४५, मालवण – २९०, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – ११२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड