रत्नागिरी जिल्ह्यात नवे २४४ करोनाबाधित, २०४ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १९ जानेवारी) करोनाचे नवे २४४ रुग्ण आढळले, तर २०४ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या १,२१० झाली आहे. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८१ हजार ९२७ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७८ हजार १७३ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९५.४२ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ७०५ पैकी ६२२ निगेटिव्ह, तर ८३ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या १,२९९ पैकी १,१३८ नमुने निगेटिव्ह, तर १६१ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ८६ हजार १२० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १,२१० रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ९८०, तर लक्षणे असलेले २३० रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ९५८ असून, संस्थात्मक विलगीकरणात २५२ जण आहेत. आणखी ४९ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ११८, तर डीसीएचमध्ये ११२ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये २२ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात ७ रुग्ण दाखल आहेत.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९५ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०५ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७५, चिपळूण ४८१, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८३१, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९५).

लसीकरणाची स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात १८ जानेवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ७९ सत्रे पार पडली. त्यात ७३१ जणांनी लशीचा पहिला, तर ४,९१० जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण ५,६४१ जणांचे लसीकरण झाले. १८ जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ४२ हजार ५१८ जणांचा पहिला, तर ७ लाख ९१ हजार ९०० जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत. त्यामध्ये १५ ते १७ वयोगटातील ५७१, तर बूस्टर डोस घेतलेल्या ४९३ जणांचा समावेश आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply