Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाचे सक्रिय रुग्ण ५० हून कमी

pexels-photo-3952232.jpeg

Photo by cottonbro on Pexels.com

Advertisements

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या ५० हून कमी झाली आहे. आज एकही नवा रुग्ण जिल्ह्यात आढळला नाही.

आज करोनाचे ७ रुग्ण बरे वाटल्याने घरी गेले असून ४७ रुग्ण सक्रिय असल्याने विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी त्याबाबतचा अहवाल दिला आहे.

अहवालानुसार आज (दि. ९ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात ७४ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ४७ रुग्णांपैकी ५ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात ५७ हजार ३७३ रुग्ण बाधित आढळले, तर ५५ हजार ७९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग २, कणकवली ४, कुडाळ ८, मालवण १९, सावंतवाडी ५, वैभववाडी १, वेंगुर्ले ७, जिल्ह्याबाहेरील ०.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ५२७ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८५, दोडामार्ग – ४६, कणकवली – ३१९, कुडाळ – २५४, मालवण – २९९, सावंतवाडी – २१६, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version