राजापूर : शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या १०१ प्रतींची देणगी देऊन देसाई शिक्षक दांपत्याने शिवजयंती उत्सव आगळ्या पद्धतीने साजरा केला.
जुवाठी (ता. राजापूर) येथे माध्यमिक शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी सुरू केलेल्या अक्षरमित्र ग्रंथभेट उपक्रमासाठी शिवाजी कोण होता, या पुस्तकाच्या १०१ प्रतींची देणगी गोठणे-दोनिवडे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश निवृत्ती देसाई आणि खारेपाटण येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या प्रा. सौ. रश्मी रमेश देसाई या दाम्पत्याने दिली.
श्री. गोंडाळ यांनी यावर्षीच्या शासकीय शिवजयंती उत्सवापासून कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? हे क्रांतिकारी पुस्तक वाचकांना वाचण्यासाठी देऊन वैचारिक शिवजयंती उत्सव सुरू केला आहे. या त्यांच्या उपक्रमासाठी देसाई शिक्षक दाम्पत्याने ही देणगी श्री. गोंडाळ यांना दिली. ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाटली जाणार आहेत.
