रत्नागिरी : गेल्या १४ ते १६ मे या तीन दिवसांत सलग सु्ट्या असल्यामुळे सोडण्यात लेल्या जादा आणि नियमित गाड्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात एसटीला २ कोटी ६७ लाख ४० हजारांचे उत्पन्न तिकीट विक्रीतून मिळाल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात सुटीच्या काळात पर्यटकांनी तसेच चाकरमान्यांनी मोठी गर्दी केली. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने १४ मेर ६४८ गाड्या सोडल्या. त्यातून ८५ लाख ७४ हजार ६०४ रुपयांची तिकिटे विकली गेली. एक लाख ६८ हजार १६५ प्रवाशांनी या काळात प्रवास केला. रविवार, १५ मे रोजी ६४७ गाड्या सोडण्यात आल्या. त्यातून एक लाख ६९ हजार २५७ प्रवाशांनी प्रवास केला. त्यांच्याकडून ९२ लाख ३६ हजार ९७४ रुपयांचे उत्पन्न एसटीला मिळाले. सोमवारी, १६ मे रोजी एक लाख ६१ हजार ९११ प्रवाशांनी ६६० गाड्यांमधून प्रवास केला. त्यांच्याकडून ८९ लाख २८ हजार ४३६ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
चाकरमान्यांच्या मुंबईच्या परतीच्या प्रवासासाठी मुंबई, बोरिवली, पुणे, ठाणे, नालासोपारा, भाईंदर आणि विरार या मार्गावर जादा गाड्या सोडून प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. प्रवाशांनी एसटीच्या बसमधून किफायतशीर दरात आणि सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड