नीलेश राणे यांच्या मदतीमुळे अर्जुना नदी झाली गाळमुक्त

राजापूर : माजी खासदार नीलेश राणे यांच्या सक्रिय सहकार्यामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना नदी पावसाळ्यापूर्वी गाळमुक्त झाली आहे.

रायपाटण ग्रामस्थांच्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत माजी खासदार नीलेश राणे यांनी अर्जुना नदीतील गाळ उपसा करण्याचे स्वखर्चातून सुरू केलेले काम आता पूर्ण झाले आहे. गाळउपशानंतरचे परिसराचे चित्र बोलके असून आता पावसाळ्यात हा परिसर पूरमुक्त राहणार आहे.

राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीमध्ये साचलेल्या गाळामुळे आलेल्या महापुराचा फटका गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात रायपाटणसह लगतच्या गावांना बसला होता. अर्जुना नदीत साचलेल्या गाळामुळे नदीला अनेवेळा पूर येऊन पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे अर्जुना नदीतील गाळ उपसा करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश सचिव श्री. राणे यांच्याकडे केली होती. त्यांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन अर्जुना नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेत ग्रामस्थांना एक पोकलेन तत्काळ उपलब्ध करून दिला. त्याद्वारे नदीतील गाळ काढून टाकण्यात आला आहे. गाळमुक्तीने परिसरातील गावांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. नीलेश राणे यांनी स्वत: लक्ष घालून पावसाळ्यापूर्वी हा गाळ काढण्याबाबत कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता झाली आहे.

दहा दिवसांत रायपाटण येथील अर्जुना नदीतील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले. ग्रामस्थांनी दहा दिवसांपूर्वीचे आणि नंतरचे चित्र अत्यंत बोलके होते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. शासनाच्या मदतीची वाट पाहत राहिलो असतो तर यावर्षीही परिसरातील असंख्य गावे पुरात बुडाली असती. मनुष्यहानीही झाली असती. मात्र आमच्या विनंतीला निलेश राणे यांनी खऱ्या अर्थाने न्याय दिला अशी प्रतिक्रियादेखील ग्रामस्थांनी दिली आहे.

याच पोकलेनने अर्जुना नदीतील गाळ काढण्यात आला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply