श्यामची आई, शिवाजी कोण होता? पुस्तकांचे वाटप

कणकवली : येथे राष्ट्र सेवा दल शिबिरातील विद्यार्थ्यांना जुवाठी (ता. राजापूर) येथील माध्यमिक शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी श्यामची आई तर प्रमुख अतिथींना शिवाजी कोण होत? हे पुस्तक भेट दिले.

कणकवली येथील अद्वैत फाउंडेशनचे संस्थापक राजन आणि सरिता चव्हाण या उभयतांनी गोपुरी येथील आप्पासाहेब पटवर्धन आश्रमात राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्त्व विकास शिबिर आयोजित केले होते. या निवासी शिबिरामध्ये ६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्वांना श्री. गोंडाळ यांनी श्यामची आई हे पुस्तक, तर उपस्थित प्रमुख अतिथींना शिवाजी कोण होता? हे पुस्तक शिबिराच्या समारोप समारंभात भेट म्हणून दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा जनता दलाच्या ज्येष्ठ नेत्या कमलाताई परुळेकर, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजवादी लेखक राजा शिरगुप्पे, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, सेवा दलाचे राष्ट्रीय प्रशिक्षक बाबा साहेब नदाफ, अद्वैत फाऊंडेशनचे संस्थापक राजन चव्हाण, सरिता चव्हाण, ओणी येथील वात्सल्य मंदिरचे अध्यक्ष डॉक्टर महेंद्र मोहन आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply