रेटिनातज्ज्ञ आपल्या गावात उपक्रम जैतापूर, नाटे आणि देवरूखमध्येही राबविणार
रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर या सुसज्ज हॉस्पिटलतर्फे रेटिना रुग्णांची थेट गावातच तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोट्यवधी रुपयांची मशिनरी गावात नेऊन तेथे रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. आजपासून (दि. २६ मे) या उपक्रमाला प्रारंभ झाला असून तो येत्या २८ मेपर्यंत चालणार आहे. त्यासाठी राजापूर तालुक्यात ३ आणि देवरूखमध्ये १ शिबिर आयोजित केले आहे.
इन्फिगोमध्ये अद्ययावत मशिनरीद्वारे रुग्णांची तपासणी करण्यात येते. करोना काळात बऱ्याच रुग्णांना उपचारासाठी येऊ शकले नाहीत. जिल्ह्यात पूर्ण वेळ रेटिनातज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे इन्फिगोमध्ये दर महिन्यात तीन दिवस उच्च प्रशिक्षित आणि हजारो शस्त्रक्रियांचा अनुभव असणारे रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत तपासणी करतात. रक्तातील सततच्या अनियंत्रित साखरेच्या पातळीमुळे डायबेटिस असणाऱ्यांच्या डोळ्यांचा पडदा, किडनी, हृदय, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांवर दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. डोळ्याच्या पडद्यावर साखरेमुळे होणारे परिणाम हळूहळू दृष्टिनाश घडवून आणतात. यामुळे डोळ्यात वारंवार जंतुसंसर्ग होणे, तरुण वयात मोतीबिंदू होण्याची शक्यता, पडद्यावरील रक्तवाहिन्यांची हानी होऊन त्या ठिसूळ होणे, अशा ठिसूळ रक्तवाहिन्या साध्या खोकण्याने अथवा शिंकण्यानेसुद्धा क्वचित प्रसंगी फुटणे, डोळ्यांत रक्तस्राव होणे, पडद्याला सूज येणे, छिद्र पडणे किंवा पडदा सरकणे असे प्रकार घडू शकतात. डायबेटिसमुळे होणारा दृष्टिनाश कायमस्वरूपी असतो. ही हानी कधीही भरून येत नाही. अनेकदा डायबेटिस असण्याऱ्या व्यक्तींच्या डोळ्यांची हानी वेळीच लक्षात येत नाही. लक्षात येते, तेव्हा उशीर झालेला असतो. डोळ्यात थेंब घालून पडद्याची तपासणी व डोळ्याचा थ्री डी स्कॅन करुन पडद्याचे झालेले नुकसान तपासून घेता येते. नंतर पुढील उपचार करता येतात.
रत्नागिरी जिल्ह्यात डोळे व रेटीना यावरील उपचार फक्त ‘इन्फिगो’ मध्येच केले जातात. रेटीनाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया व लेझर उपचार सुप्रसिद्ध रेटीना तज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत यांच्या वैयक्तिक सल्ल्याने केले जातात. डॉ. प्रसाद कामत चेन्नईतील शंकर नेत्रालयातून प्रशिक्षित आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रेटीना तज्ञ आहेत.
डायबेटिस असणाऱ्या सर्वांची गैरसोय लक्षात घेऊन ‘रेटीनातज्ज्ञ आपल्या गावात’ या अभियानाद्वारे स्लिट लॅम्प आणि १० पद्धतीने पडद्याची तपासणी व उपचार करणार आहेत. या शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून तपासणीसाठी प्रत्येकी साधारण ४५ ते ५० मिनिटे लागतात. नोंदणी फी केवळ १०० रुपये असून अत्याधुनिक जर्मन थ्रीडी स्कॅन आणण्यात येईल. डोळ्यांच्या पडद्याचा थ्री डी स्कॅन ३ हजारऐवजी शिबिराच्या दिवशी दीड हजार रुपयांत करण्यात येणार आहे. रुग्णांनी नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्वनोंदणीसाठी 9372766504/ 9372766508 या क्रमांकावर संपर्क साधावा. शिबिराचे वेळापत्रक असे – २६ मे – डॉ. जोशी हॉस्पिटल, राजापूर, सकाळी ९.३० ते दुपारी ७.३०. २७ मे – न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर, सकाळी ९.३० ते दुपारी १.३०. २७ मे – नाटे ग्रामपंचायत सभागृह, दुपारी ३ ते सायंकाळी ७.३०. २८ मे – मातृमंदिर हॉस्पिटल, देवरूख, सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.००.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
