पुण्यातील सभागृहासाठी चिपळूणमधून माधव ज्युलियन यांचे तैलचित्र

चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुण्यातील माधवराव पटवर्धन सभागृहात लावण्यासाठी माधवराव पटवर्धन तथा माधव ज्यूलियन यांचे तैलचित्र येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे भेट म्हणून देण्यात आले.

वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात परिषदेचे उपाध्यक्ष आणि कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्याकडे हे तैलचित्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी मसाप कोकण प्रतिनिधी आणि साहित्यिक प्रकाश देशपांडे उपस्थित होते.

यापूर्वी याच सभागृहात लावण्यासाठी औंधचे राजे भवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचेही तैलचित्र वाचनालयाने मसापला दिले होते. ही दोन्ही तैलचित्रे मसापच्या नूतनीकरण झालेल्या सभागृहात लावण्यात येणार आहेत. वाचन मंदिरातर्फे हे तैलचित्र कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी डॉ. चोरगे यांच्याकडे दिले.

यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष सुनील खेडेकर, सुधीर पोटे, राष्ट्रपाल सावंत, कार्यवाह विनायक ओक, संचालक संजय शिंदे, सौ. अंजली बर्वे आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply