रत्नागिरीतील वर्तक यांच्या सजावटीला दापोलीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक

रत्नागिरी : दापोलीतील कै. कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठानच्या युवा प्रेरणा कट्टामार्फत आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक बाप्पा सजावट स्पर्धेत कुवारबाव (रत्नागिरी) येथील संजय वर्तक यांच्या सजावटीला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

दापोलीतील कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानच्या युवा प्रेरणा कट्ट्याने गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत पर्यावरणपूरक स्वदेशी सजावटीला महत्त्व देण्यात आले. ही स्पर्धा खुली आणि ऑनलाइन पद्धतीने असल्याने महाराष्ट्रातील विविध भागांतून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सांगली, पुणे, मुंबई, ठाणे, डोंबिवली, रत्नागिरी इत्यादी अनेक शहरे आणि दापोली तालुक्यातील विविध गावांमधील एकूण ७० जणांनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धा विनाशुल्क होती. मूर्ती आणि सजावटीची छायाचित्रे प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर माहितीसह अपलोड करावयाची होती. स्पर्धेचे परीक्षण दापोलीतील सुप्रसिद्ध कलाकार, विद्याधर ताम्हणकर आणि स्वप्नील शिंदे यांनी केले. मूर्ती शाडूची असावी तसेच सजावट करताना वापरलेल्या सर्व वस्तू स्वदेशी आहेत का, त्या पर्यावरपूरक आहेत का, त्यातून सामाजिक संदेश दिला आहे का, अशा विविध मुदद्यांच्या आधारे परीक्षण करण्यात आले. सर्व स्पर्धकांनी मनापासून घेतलेल्या मेहनतीचे कौतुक स्पर्धेचे संयोजक प्रमोद पांगारकर यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनात युवा प्रेरणा कट्ट्याच्या सर्वच कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

स्पर्धेचा निकाल असा – प्रथम: संजय जगन्नाथ वर्तक (रत्नागिरी). द्वितीय : शीतल विठ्ठल कोळी (सांगली). तृतीय (विभागून) : कल्पेश विकास रेळेकर आणि अमित वसंत रेमजे (दापोली). उत्तेजनार्थ : अनिल लक्ष्मण गोताड (कोतवडे, रत्नागिरी).

प्रतिष्ठानतर्फे उपाध्यक्ष मिहिर महाजन यांनी सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन केले. या विजेत्यांची सजावट mahajantrust.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे नमूद केले आहे.

वर्तक यांनी केलेली सजावट

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply