रत्नागिरी : रत्नागिरीतील आणि कोकणातील पहिल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यावर्षीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी येत्या शुक्रवारी (दि. ३० सप्टेंबर) कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
कोकणातील पहिले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय गेल्या वर्षी सुरू झाले. महाविद्यालयासाठी एक स्वतंत्र इमारत असून या महाविद्यालयात एकूण पाच अद्यावत शाखांचे पदवी अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. कोकणातील होतकरू विद्यार्थ्यांना सहज उत्तम प्रतीचा रोजगार मिळावा किंवा त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, हा या महाविद्यालयाचा उद्देश आहे. महाविद्यालयात यावर्षीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन कार्यशाळा शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे.
हे महाविद्यालय DBATU शी सलंग्न असून AICTE ची मान्यता प्राप्त शासकीय संस्था आहे. प्रथम वर्ष प्रवेशासाठी २१ सप्टेंबरपासून प्रवेश प्रक्रिया चालू झाली असून त्याबाबत कोकणातील विद्यार्थी आणि पालकांच्या मार्गदर्शनाकरिता या संस्थेने संस्थेच्या इमारतीत मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली आहे.
सर्व इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी याचा लाभ घ्यावा. या संदर्भात अधिक माहितीसाठी संस्थेचे संकेतस्थळ http://www.gcoer.org अथवा https://dte.maharashtra.gov.in किंवा https://cetcell.mahacet.org येथे माहिती पाहावी अथवा अधिक माहितीसाठी अधिष्ठाता (शैक्षणिक) प्रा. यू. एल. देशपांडे, अधिष्ठाता (प्रशासन) डॉ. यू. एस. वानखेडे, अथवा प्राचार्य डॉ. एस. एन. खंते यांच्याशी संपर्क साधावा.

