हर्षा हॉलिडेजला पर्यटन संचालनालयाचा पर्यटन मित्र पुरस्कार

सुहास ठाकुरदेसाई यांनी स्वीकारला पुरस्कार

रत्नागिरी : येथील हर्षा हॉलिडेजला महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाचा (उपसंचालक कार्यालय, कोकण विभाग) पर्यटन मित्र पुरस्कार मिळाला आहे. संचालक सुहास ठाकूरदेसाई यांनी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

पर्यटन मित्र पुरस्कार जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते स्वीकारताना हर्षा हॉलिडेजचे संचालक सुहास ठाकुरदेसाई. सोबत श्री. माळी, संजय यादवराव.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त काल (दि. २७ सप्टेंबर) रत्नागिरी जिल्हा प्रशासन, पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे अल्पबचत सभागृहात समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार श्री. ठाकूरदेसाई यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे श्री. माळी, संजय यादवराव आदी मान्यवर उपस्थित होते.

मैत्री ग्रुपच्या माध्यमातून संचालक सुहास ठाकुरदेसाई आणि कौस्तुभ सावंत यांनी २०१७ मध्ये हर्षा हॉलिडेजची स्थापना केली. कोकणचे पर्यटन वाढवावेत, कोकणात जास्तीत जास्त पर्यटक यावेत हा स्थापनेचा उद्देश होता. त्याकरिता मुंबई, पुणे येथे वेगवेगळया प्रदर्शनात सहभाग घेतला. नंतर रत्नागिरीमध्ये पर्यटकांचा मुक्काम वाढण्यासाठी हर्षा स्कुबा डायव्हिंगची प्रथमच सुरवात केली. याला पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. पर्यटनाच्या क्षेत्रातील या कार्याबद्दल त्यांना एमटीडीसीचा पर्यटन मित्र हा पुरस्कार प्राप्त झाला. नंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले. गाइड प्रशिक्षण कार्यक्रम, कोकणी खाद्यपदार्थांची स्पर्धा, पर्यटन परिषद, टुर ऑपरेटर व्हिजिट असे अनेकविध उपक्रम राबवले. यामुळे रत्नागिरीत गेल्या काही वर्षांत पर्यटनाला चांगले दिवस येऊ लागले आहेत. त्या साऱ्याची दखल घेऊन जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन संचालनालयाचा पर्यटन मित्र पुरस्कार श्री. ठाकूरदेसाई यांना देण्यात आला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply