आविष्कारच्या दीपावली प्रदर्शनाला प्रारंभ

रत्नागिरी : येथील आविष्कार संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते झाले.

स्वा. सावरकर नाट्यगृहात हे प्रदर्शन सुरू झाले असून दिवाळीसाठी रंगीत पणत्या, मेणबत्या, आकाशकंदील, शुभेच्छापत्रे आदींसह अनेक प्रकारच्या शोभिवंत वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

उद्घाटनावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, अधिकारी राहुल देसाई, शेखर सावंत, आविष्कार संस्थेचे अध्यक्ष सी. ए. बिपिन शाह, उपाध्यक्ष दीप्ती भाटकर, सचिव संपदा जोशी, खजिनदार डॉ. शरद प्रभुदेसाई, कार्यशाळा समिती अध्यक्ष नितीन कानविंदे, सदस्य पद्मजा बापट, कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर, सविता कामत विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका वैशाली जोशी, प्रतिभा प्रभुदेसाई, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी दीपावलीनिमित्त कलात्मक वस्तू बनवल्या आहेत. यामध्ये शुभेच्छापत्रे, मेणबत्त्या, पिशव्यांसह विविध शोभिवंत वस्तूंचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ऑफिस फाइल्स, पेपर डिश, फिनेल, आदी वस्तूही आहेत. येत्या २१ ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन रोज सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply