जिल्हास्तरीय साने गुरुजी कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

चिपळूण : जिल्हास्तरीय पूज्य साने गुरुजी कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धा सावर्डे (ता. चिपळूण) येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या.

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने या स्पर्धा सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात घेतल्या होत्या.

या स्पर्धांचा गटनिहाय गुणानुक्रमे निकाल असा – कथाकथन स्पर्धा –
प्राथमिक गट (पाचवी ते सातवी) आर्या अमित खेडेकर (रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड), वेदिका नितीन गुरव (युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण), वृंदा दिलीप कोतापकर (न्यू इंग्लिश स्कूल, लांजा).

कथाकथन स्पर्धा माध्यमिक गट (आठवी ते दहावी) – श्रीराम विजय आघरकर (आई आनंदी गोपाळ महाजन विद्यामंदिर, कोळथरे, ता. दापोली), सिमरन पितांबर शिंदे (माध्यमिक विद्यामंदिर, ताम्हाणे, ता. राजापूर), आर्यन विनोद बंडगर (न्यू इंग्लिश स्कूल, लांजा).

कथाकथन स्पर्धा उच्च माध्यमिक गट (अकरावी-बारावी) – ऋतुजा योगेश वायंगणकर (गोविंदराव निकम उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे, ता. चिपळूण), प्रज्ञा दामोदर पालकर (न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, लांजा), सेजल भार्गव मेस्त्री (पैसाफंड इंग्लिश स्कूल आणि ज्यु. कॉलेज, संगमेश्वर).

कथाकथन उर्दू माध्यम माध्यमिक गट (आठवी ते दहावी) – उजैर इम्तियाज भाटकर (मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी), मुस्कान इर्शाद शेख (अल अमिन उर्दू हायस्कूल, लांजा), झिया अस्लम खान (अल अमीन उर्दू हायस्कूल, पोफळी, ता. चिपळूण).

वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक गट (पाचवी ते सातवी) – वेदिका नितीन गुरव (युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण), निधी प्रकाश महाडीक (श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय, कोसुंब, ता. संगमेश्वर), मनस्वी दिवाकर मोंडे (कै. सी. ना. देसाई विद्यामंदिर, नाणार, ता. राजापूर).

वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक गट (आठवी ते दहावी) – समर्थ आनंद भावे (आई आनंदी गोपाळ महाजन विद्यामंदिर, कोळथरे, दापोली), सलोनी सुनील गमरे (नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्यु. कॉलेज, मिरजोळी, चिपळूण), सिमरन पितांबर शिंदे (माध्यमिक विद्यामंदिर, ताम्हाणे, राजापूर).

वक्तृत्व स्पर्धा उच्च माध्यमिक गट (अकरावी-बारावी) – स्नेहा संतोष शिंदे (न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्यु कॉलेज, खेर्डी चिंचघरी सती, चिपळूण), गुरुराज रवींद्र ठाकूरदेसाई (गोडे – दाते कनिष्ठ महाविद्यालय, राजापूर), स्नेहल काशिनाथ लाडे (यशवंत विद्यालय आणि कनिष्ठ कला महाविद्यालय, धामणंद, खेड)

स्पर्धेचे उद्घाटन सह्याद्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त शांताराम खानविलकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजय पाटील, स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार वारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव महेश पाटकर, खजिनदार विजय देसाई, विद्या समिती सचिव संदेश कोकाटे, सहसचिव अनंत साठे, जिल्हा प्रतिनिधी अनंत साळवी, गुहागर मुख्याध्यापक संघ अध्यक्ष मंगेश गोरिवले, चिपळूण तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष संजय चव्हाण, सचिव शंकर गलांडे, स्वागताध्यक्ष आणि सावर्डे हायस्कूल मुख्याध्यापक राजेंद्र कुमार वारे उपस्थित होते .

दोन्ही स्पर्धआंचे परीक्षण विनायक बांद्रे (डीबीजे कॉलेज चिपळूण), जान्हवी गोंधळेकर, सोनाली आहिरराव (अंजनवेल ज्यु. कॉलेज), संगीता जोशी (सुरेश दामोदर गद्रे ज्यु. कॉलेज), उदय दामले (तात्या वझे विद्यामंदिर, पाचेरी आगर, गुहागर), मंजिरी दळवी (वसंतराव भागवत विद्यालय, मार्गताम्हाणे), अशोक धनावडे (आदर्श शाळा निर्व्हाळ नं. १), जमादार (वसंत शंकर देसाई माध्यमिक आणि उच्च माध्य विद्यालय असुर्डे), आणि फौजिया खान यांनी केले.

यशस्वी विद्यार्थांना चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी शिल्ड दिल्याबद्दल मुख्याध्यापक संघाने त्यांचे आभारी मानले. सर्व विजयी स्पर्धक त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, पालक, मुख्याध्यापकांचे जिल्हा मुख्याध्यापक संघाने अभिनंदन केले.

स्पर्धेतील विद्यार्थ्यांना गौरविताना जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजय पाटील आणि पदाधिकारी
Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply