रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रत्नागिरी शाखेतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रत्नागिरीतील निवडक महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात येणार असून त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या उद्योगलक्ष्मी पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही एक मराठी उद्योजकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली सामाजिक संस्था आहे. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची रत्नागिरी शाखा गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत आहे. मराठी उद्योजकांना एकत्र आणणे, त्याचबरोबर महिलांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, वाव देणे यासाठी सॅटर्डे क्लबतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. उद्योजिकांच्या समस्या समजून घेणे, त्यावर उपाय शोधण्यासाठी मदत करणे, व्यवसायातील विविध विषयांवर मार्गदर्शन करणे, तसेच उद्योजकीय मानसिकता रुजवणे यासाठी सॅटर्डे क्लब नेहमीच अग्रेसर राहिला आहे.
जागतिक महिला दिनाच्या औचित्याने रत्नागिरीतील महिला उद्योजिकांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या १० मार्च रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीत जास्त महिला उद्योजिकांनी गूगल फॉर्म भरून आपली माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी महिला विभागाच्या विभागीय प्रमुख मानसी महागावकर (9890991407) किंवा समन्वयक गीता भागवत (8275433735) यांच्याशी संपर्क साधावा.
माहिती पाठविण्यासाठी गूगल फॉर्मची लिंक –
https://forms.gle/duLLH7v1vAeKNmPc9
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

