रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला गोवा शिपयार्डकडून पंधरा लाखाची यंत्रसामग्री

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला गोवा शिपयार्डच्या सीएसआरमधून उपचारांसाठी उपयुक्त अशी पंधरा लाखाची यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गोवा शिपयार्डचे स्वतंत्र संचालक आणि येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या प्रयत्नांमधून ही यंत्रसामग्री देण्यात आली आहे.

गोवा शिपयार्ड पब्लिक लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर फंडातून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला डायलेसिस युनिटसाठी चार यूपीएस आणि ॲनेस्टेशिया मशीन मंजूर करून देण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही यंत्रसामग्री रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आली.
ॲनेस्टेशियाचे हे मशीन रत्नागिरी रुग्णालयातील शस्त्रक्रियांसाठी खूप उपयुक्त आहे, असे डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले. डायलेसिस युनिटचे यंत्र अद्यावत गरजेनुरूप सुरू राहावे, म्हणून गोवा शिपयार्डने दिलेले चार यूपीएस अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त आहेत. ही यंत्रसामग्री पुरविल्याबद्ल डॉ. फुले यांनी गोवा शिपयार्ड आणि ॲड. पटवर्धन यांना धन्यवाद दिले.

गोवा शिपयार्ड कंपनीच्या माध्यमातून युद्धनौका बनवण्याचे काम केले जाते. नेव्ही, कोस्ट गार्डसह अनेक शासकीय विभागांना आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या बोटी तयार करण्याचे कामही कंपनी करते. देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी ही कंपनी काम करते. अशा कंपनीच्या माध्यमातून काम करण्याची संधी भाजपाच्या नेतृत्वाने ज्या विश्वासाने माझ्यावर सोपवली आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, पूर्ण कार्यक्षमतेने काम करण्यासाठी मी दृढ संकल्पित आहे, असे सांगून गोवा शिपयार्डच्या ऑडिट समितीचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनुरूप गोवा शिपयार्डचे संचालक मंडळ चेअरमन ॲड. एम. डी. ब्रिजेशकुमार, उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम करीत आहे. या संरक्षण क्षेत्रातील कंपनीमध्ये निर्देशक म्हणून काम करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य समजतो.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, उमेश कुलकर्णी, नितीन जाधव, राजन पटवर्धन, पर्शुराम ढेकणे, सौ. वर्षा ढेकणे, बाबू सुर्वे, ॲड. नीलेश आखाडे, श्री. बेर्डे, सौ. सुप्रिया रसाळ, विक्रांत जैन, शहर अध्यक्ष सौ. आंबेरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply