तळेऱ्यात शिवराई नाण्यांचे पूजन करून शिवजयंती

तळेरे (ता. कणकवली) : ज्येष्ठ नाणीसंग्रहाकडून भेट म्हणून मिळालेली शिवराई नाणी देव्हाऱ्यात पूजेला ठेवून येथील नाणी संग्राहक आणि संदेशपत्र संग्राहक निकेत पावसकर यांनी आगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करून शिवरायांना मानवंदना केली.

तळेरे येथे निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला मुंबईतील नाणीसंग्राहक राजा जाधव यांनी सदिच्छा भेट दिली. शिवाय शिवराई नाण्यांसह इतर अनेक ऐतिहासिक नाणी निकेत पावसकर यांना भेट दिली, त्यावेळी ते म्हणाले की, कदाचित छत्रपती शिवाजी महराजांनी प्रत्यक्ष हातात घेतले नसेल. मात्र त्यावेळी स्वराज्यातील मावळ्यांनी ही नाणी हाताळली आहेत. म्हणजेच अप्रत्यक्षपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श या नाण्यांना झालेला आहे. त्यामुळे ही नाणी जपून ठेव.
राजा जाधव यांच्याकडे ५०० पेक्षा जास्त शिवराई तर ऐतिहासिक १५ हजारापेक्षा जास्त दुर्मीळ नाणी आहेत.
नाण्यांच्या खजिन्याची भेट
या भेटीदरम्यान राजा जाधव यांनी निकेत पावसकर यांना कुशान-१ आणि २, वैष्णोदेवी नाणे, १९७० ची उलटा सूर्य आणि कमळ असलेली नाणी, दिदारानी काश्मीर, नागपूर भोसला, महमद बीन तघलघ (१२०० ते १४००), हैदराबाद निझाम (चांदीचे नाणे), होळकर इंदूर (चांदीचे नाणे) आणि शिवराई अशा ३८ दुर्मीळ आणि ऐतिहासिक नाण्यांचा खजिना भेट दिला.
निकेत पावसकर यांच्याकडेही विविध १५ देशांच्या नाणी आणि नोटांसह अत्यंत दुर्मीळ नाणी आणि नोटा आहेत. याबाबत बोलताना निकेत पावसकर म्हणाले की, आजवर भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंमध्ये राजा जाधव यांनी दिलेली “शिवराई” नाणी माझ्यासाठी महत्त्वाची आहेत. राजा जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे शिवराई नाणी आज शिवजयंतीला देव्हाऱ्यात पूजेला ठेवली आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply