इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी : इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रत्नागिरी शाखेने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.

शालेय गटातून खेडशी हायस्कूलच्या कुमारी अनन्या रेवाळेने, तर खुल्या गटातून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ऋतुजा चाळके हिने प्रथम क्रमांक पटकावला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून इंडियन रेडक्रॉस सोसायटीमार्फत नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान रक्तदान अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने रत्नागिरी शाखेने निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. शालेय गट (आठवी ते बारावी) आणि खुला गट अशा दोन गटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेकरिता शालेय गटासाठी आजच्या युगातील रक्तदानाचे महत्त्व किंवा फास्टफूडचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तर खुल्या गटासाठी रक्तदान – समज आणि गैरसमज किंवा इंडियन रेडक्रॉस सोसायटीची कार्यप्रणाली असे विषय देण्यात आले होते.

निबंधांचे तज्ज्ञ परीक्षकांकनी परीक्षण केले. प्रत्येक गटातून ३ गुणवत्ता क्रमांक काढण्यात आले आहे. स्पर्धेचा उर्वरित निकाल असा – शालेय गट – कस्तुरी आंब्रे (गोगटे-जोगळेकर), मंजिरी गुरव (हातखंबा ज्युनिअर कॉलेज). खुला गटृ – साहील कदम (गोगटे-जोगळेकर), सौ. पर्णिका मुळ्ये (बंदर रोड, रत्नागिरी). प्रत्येक गटातील तीन क्रमांकाना अनुक्रमे ७५०, ५०० आणि २५० रुपये रोख आणि प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेच्या संयोजनाची जबाबदारी रेडक्रॉसच्या मानद सचिव सौ. वीणा सामंत यांच्या नेतृत्वाखाली अरुण मुळ्ये, चंद्रमोहन देसाई यांनी सुव्यवस्थितपणे पार पाडली. सर्व यशस्वी स्पर्धकांना त्यांची पारितोषिके लवकरच पोहोचविण्यात येतील, असे संयोजकांनी जाहीर केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply