Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

दापोलीत ३० एप्रिलला लाखाच्या बक्षिसांची सायकल स्पर्धा

Advertisements

दापोली : दापोली सायकलिंग क्लबतर्फे येत्या ३० एप्रिल रोजी दापोली समर सायक्लोथॉन सीझन ३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी आणि सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दापोलीच्या आझाद मैदानातून स्पर्धेला प्रारंभ होईल. यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून अनेक नावाजलेले सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत येणार आहेत.

ही स्पर्धा १ ते ६० किलोमीटरची असून शॉर्ट सिटी लूप, ६० किमी कोस्टल सिनिक रूट, ३० किमी, २१ किमी सायकल रेस खुला गट, महिला गट, एमटीबी, सिंगल गिअर अशा गटांत स्पर्धा होईल. खुल्या गटासाठी ११ हजार १११, ७ हजार ७७७, ५ हजार ५५५, ३ हजार ३३३ आणि एक हजार १११ रुपये, महिला गट, एमटीबी, सिंगल गिअरसाठी प्रत्येकी ५ हजार, ३ हजार आणि एक हजार रुपये आणि चषक अशी बक्षिसे असतील. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. शिवाय ५०+ लकी ड्रॉ बक्षिसेही असतील.

साठ किलोमीटरचा सायक्लोथॉन मार्ग आझाद मैदान ते हर्णै, आंजर्ले, आडे उटंबर दापोली असा असेल. मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, मेडिकल मदत असेल. एक व दोन किलोमीटरची फन राइड विनामूल्य असेल.

येत्या २० एप्रिलपर्यंत स्पर्धेसाठी नोंदणी करता येईल. ऑफलाइन नोंदणी सुनील ऑटोमोबाइल, विनी इलेक्ट्रिकल फॅमिली माळ, श्री सायकल मार्ट, जोशी ब्रदर्स मेडिकल बाजारपेठ, रसिक मोटर्स आझाद मैदान या ठिकाणी करता येईल. शकता. नोंदणी प्रवेश शुल्क ३०० आणि ४०० रुपये असून अधिक माहितीसाठी अंबरीश गुरव (८६५५८७४४८६), केतन पालवणकर (८७६७६५०५३७) किंवा सूरज शेठ (८३०८३६६३६६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाइन नोंदणीकरिता लिंक – https://forms.gle/oHf8R5Rk1ZJbwQ7v6

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version