लांजा : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि भूदान चळवळीतील विनोबा भावे यांचे विश्वासू सहकारी नानासाहेब वंजारे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने लांजा येथे झालेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
वंजारे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत कै. सौ. रमा नारायण शेट्ये ट्रस्टतर्फे नाना -नानी शांती निवासात हे शिबिर झाले. लांजा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले. यावेळी ३५ दात्यांनी रक्तदान केले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब वंजारे, न्यू एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील ऊर्फ राजू कुरूप, प्राचार्य डॉ. अरविंद कुळकर्णी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्ना शेट्ये, दीपिका रांबाडे, माजी विद्यार्थी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजू धावणे, सचिव विनय बुटाला, प्रा. डॉ. राहुल मराठे, प्रा. डॉ. महेश बावधनकर, प्रा. डॉ. राजेश माळी, प्रा. डॉ. काशिनाथ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

