माहात्म्य अधिकमासाचे – श्लोक चौथा

१८ जुलै २०२३पासून अधिक श्रावण शके १९४५ हा महिना सुरू झाला आहे. त्या निमित्ताने या महिन्याचे महत्त्व विशद करणारी ही मालिका.
……


२१ जुलै २०२३
अधिक श्रावण शुद्ध चतुर्थी, शके १९४२

तत्तेजः पिहिताक्षोsसौ शनैरुन्मील्य लोचने।
मन्दं मन्दं जगामाधिमासंकृत्वा स्वपृष्ठतः ।।४।।

अर्थ : त्या महालाच्या तेजाने डोळे दिपून गेलेल्या विष्णूंनी आपले चक्षू हळुवारपणे उघडले व अधिक मासाला आपल्या मागे घेऊन मंद पावले टाकत ते महालाकडे निघाले.
…………..

अधिकमासाविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी, तसेच या अध्यायातील आधीचे श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……………..

सौ. प्रतिभा शरद प्रभुदेसाई

अधिक महिन्याचे महत्त्व सांगणारी मोठी पोथी आहे. महिन्यातील प्रत्येक दिवसानुसार ३१ दिवसांचे महत्त्व त्यात सांगितले गेले आहे. प्रत्येक अध्यायात ३० ते ५५ असे सुमारे १२०० श्लोक आहेत. श्रीकृष्णाने अधिकमासाचे दुःख दूर करून त्याला ‘पुरुषोत्तम मास’ असे नाव दिले, ही कथा सहाव्या अध्यायात आहे. संस्कृतमध्ये असलेल्या या पोथीविषयी कुतूहल निर्माण व्हावे, या उद्देशाने त्या सहाव्या अध्यायातील श्लोकांचा अर्थ येथे दिला जात आहे. हा अनुवाद रत्नागिरीच्या फाटक प्रशालेतील माजी शिक्षिका सौ. प्रतिभा शरद प्रभुदेसाई यांनी करून दिला आहे. सौ. प्रभुदेसाई एमए, बीएड, पंडित आहेत. त्यांनी फाटक प्रशालेत संस्कृत आणि इंग्रजीचे अध्यापन केले आहे. त्या सध्या गतिमंद मुलांसाठी निःशुल्क मार्गदर्शन करत आहेत.
……..
समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. ते आणि त्याचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……….

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply