मराठा सेवा संघाच्या ऐरोलीतील वातानुकूलित सभागृहाचे उद्घाटन

नवी मुंबई : ऐरोली (नवी मुंबई) येथील रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या तुळजाभवानी सभागृह क्र. एक या वातानुकूलित सुसज्ज सभागृहाचे थाटात उद्घाटन झाले.

सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या हस्ते विधिवत पूजन करून सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. कोनशिला अनावरण माजी अध्यक्ष आबा आंब्रे यांच्या हस्ते झाले.

सर्व समाज बांधवांनी केलेले प्रयत्न, सर्व भाविक शुभचिंतक यांची साथ यामुळेच इथपर्यंत मजल गाठण्यात आपण यशस्वी झाल्याचे तसेच यापुढे सर्वांचे सहकार्य लाभावे असे श्री. दादा कदम यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रम नियोजन समिती, कार्यकारिणी समिती यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याचे त्यांनी म्हटले.

याच समारंभात सामाजिक क्षेत्रात काम करणारे प्रतिष्ठित, रत्नागिरी जिल्ह्यातील सरपंच तसेच संघाच्या स्थापनेपासूनचे पदाधिकारी, १९९३ चे पहिले अध्यक्ष अंबाजी आंब्रे यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय सैन्य दलातील निवृत सुभेदार, एनएसजी कमांडो महेश तुकाराम आंब्रे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संघाध्यक्ष श्री. कदम यांना एका सर्वसामान्य कुटुंबातील वृत्तपत्र विक्रेता ते विद्युत क्षेत्रातील अग्रगण्य व्यावसायिकापर्यंतचा टप्पा गाठून सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते रत्नागिरी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांसाठी ई लायब्ररी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ठाणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी यावेळी दिली.

समारंभाला स्थानिक नगरसेवक एम. के. मढवी, करण मढवी, आमदार रमेशदादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, शिवसेना शहरप्रमुख द्वारकानाथ भोईर, विविध क्षेत्रातील मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुदेश शिर्के यांनी महाप्रसाद वाटपाचे नियोजन केले, तर सूत्रसंचालन संतोष मोरे यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply