Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

अमोल रेडीज यांचे नवे ईठ्ठला नाटक राज्य नाट्य स्पर्धेत

Advertisements

लांजा : लेखक, दिग्दर्शक, अभिनेते अमोल रेडीज यांचे ईठ्ठला हे नवीन नाटक राज्य हौशी नाट्य स्पर्धेत यावर्षी सादर करण्यात येणार आहे.

अमोल रंगयात्री संस्थेचे संस्थापक अमोल रेडीज प्रथितयश लेखक असून त्यांची जिहाद, दी गेम ऑफ डेस्टिनी, मुखवटे ही नाटके आणि काही एकांकिका राज्य नाट्य स्पर्धेत तसेच इतर ठिकाणी बक्षीसपात्र ठरली. लेखक म्हणून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.

मोठ्या प्रतीक्षेनंतर त्यांचे ईठ्ठला हे नवीन नाटक रंगमंचावर येणार आहे. या नाटकाचे प्रथम वाचन कोंड्ये (ता. लांजा) येथील श्री गजानन मंगल कार्यालयात पार पडले. ओघवत्या आणि धीरगंभीर आवाजात श्री. रेडीज यांनी नाटकाचे वाचन केले.. एकेक प्रवेश जसजसा वाचून पूर्ण होत होता, तसतसे श्रोत्यांच्या अंगावर शहारे येत होते. त्याचवेळी नाटकाची उंची आणि खोली समजत होती.

आशयघन, रहस्यप्रधान आणि उच्च तत्त्वज्ञान मांडणारे हे नाटक यावर्षी राज्य नाट्य स्पर्धेत “अमोल रंगयात्री ” ही संस्था सादर करणार असल्याचे निर्माता जयू पाखरे आणि व्यवस्थापक शरद चव्हाण यांनी सांगितले. वाचन कार्यक्रमाला अमोल रंगयात्रीचे सर्वच सभासद आणि हितचिंतक उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version