Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

Advertisements

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे दुसरी जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी विषय असे – १) मोफत संस्कृती …. किती आवश्यक?, २) स्वातंत्र्य की स्वैराचार.. ३) आमचं कोकण जगात भारी! ४) अपराजित योद्धा… बाजीराव पेशवे, ५) योजना आणि याचना. या पाचपैकी कोणत्याही एका विषयावर भाषण करणे अपेक्षित आहे. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे २०००, १५०० आणि १०००, तर उत्तेजनार्थ प्रत्येकी ५०० रुपयांची दोन पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र दिले जाईल. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.

स्पर्धा फक्त एकाच खुल्या गटासाठी आहे आणि सगळ्यांसाठी खुली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी यामध्ये भाग घेऊ शकतो. वेळ मर्यादा कमीतकमी ६ ते जास्तीतजास्त ८ मिनिटे असेल. किमान वेळेपेक्षा भाषण कमी किंवा जास्त झाल्यास स्पर्धक बाद होईल. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी अविनाश काळे (९४२२३७२२१२) यांच्याशी ५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत नावनोंदणी करावी. स्पर्धा १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येईल. स्पर्धकांना वेळ कळविण्यात येईल. स्पर्धेबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धा अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात (ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृह, जोशी पाळंद, रत्नागिरी) येथे होईल.

स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस समारंभ स्पर्धा संपल्यानंतर लगेच होईल. याचवेळी मंडळाने घेतलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभसुद्धा होणार आहे.

अधिक माहितीसाठी कार्यवाह राजेंद्र पटवर्धन (९८६०३६६९९१), कार्यकारी सदस्य अॅड. अविनाश काळे (९४२२३७२२१२) किंवा कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी (९४०४३३२७०५) यांच्याशी संपर्क साधावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version