शाळा तपासण्यासाठी ७२ मुद्दे पाहणे आवश्यक- डॉ. विनय नातू

चिपळूण : एखाद्या शाळेचे कामकाज कसे चालू आहे हे तपासायचे असेल तर किमान ७२ मुद्दे पाहावे लागतात. शैक्षणिक, प्रशासकीय आणि इतर कामकाजाचाही यात समावेश असतो, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केले.

मालघर (ता. चिपळूण) येथे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असलेले रामभाऊ साठे ऊर्फ साठे सर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात ते बोलत होते. शाळा तपासण्यासाठी कोणती रजिस्टर बारकाईने तपासायची म्हणजे शाळेची गुणवत्ता आणि तेथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता आणि कौशल्य याचा नेमका अदमास घेता येतो, याचा धडा मला रामभाऊ साठे यांनी दिला. आयुष्यात शैक्षणिक संस्था चालवताना त्यांनी शिकवलेल्या या मार्गावरूनच आम्ही चाललो, असे त्यांनी सांगितले. शाळा तपासताना कोणती रजिस्टर बघायची, याचे नमुने त्यांनी सांगितले होते. कोणते कोपरे बघायचे, हेही सांगितले होते. शाळेत ग्रंथालय असते. किमान असावे. त्यातील पुस्तक देवघेव रजिस्टर बघायचे. मुलांनी किती पुस्तके नेली, शिक्षकांनी किती पुस्तके वाचली याचा अंदाज येतो, हे उदाहरण डॉ. नातूंनी देताच खसखस पिकली.

डॉ. नातू म्हणाले, माझे वडील डॉ. तात्या नातू आणि साठे यांनी तालुक्यात शैक्षणिक संस्थांमार्फत सुमारे २५ शाळा सुरू केल्या. आजही नातू प्रतिष्ठानतर्फे आणि इतर संस्थांतर्फे या शाळांचा कारभार सुरू आहे. त्याची पायाभरणी साठे यांनी केली. तात्या नातू यांनी संस्था चालवण्यासाठीचे जणू सर्वाधिकार साठे यांना दिले होते. संस्था चालवतानाची त्यांची तडफ, तळमळ आणि दूरदृष्टी यामुळे रामपूर शाळेचेच नव्हे तर संस्थेचे पालकत्वही साठे सरांकडे होते. त्या काळात एकाच संस्थेच्या छत्राखाली शाळा न चालवता वेगवेगळ्या संस्था निर्माण केल्या. नाहीतर जिल्ह्यातील सर्वाधिक शाळा असलेली ही संस्था झाली असती; मात्र कारभार करण्याचे अधिकार पूर्ण विश्वास टाकून द्यायचे, म्हणजे एका अर्थाने विकेंद्रीकरण करायचे. त्यावर अंमल रामपूर एज्युकेशन सोसायटीतूनच होत होता. त्या काळात एसटी तिकिटावर अपॉइंटमेंट असायची. गरज पडली तर बदली आदेशही निघायचा; मात्र साठे सरांची अदब अशी होती की, संबंधित शिक्षक बदलीच्या ठिकाणी निमूट जायचा, अशी आठवणही नातू यांनी सांगितली.

रिसरात शिवरायांची छावणी होती.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply