डोंबिवलीच्या काव्य रसिक मंडळाची विद्यार्थ्यांसाठी काव्यलेखन स्पर्धा

डोंबिवली : येथील काव्य रसिक मंडळाने दरवर्षीप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठी काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. घेत आहे. स्पर्धेचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.

स्पर्धेची संकल्पना आणि संयोजन सौ.अंजली बापट यांचे आहे. मराठी भाषेतील काव्यासाठी ही स्पर्धा होत असून कवितेला विषयाचे बंधन नाही. स्पर्धेकरिता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे दोन गट असतील. कविता पाठवताना, काव्यरसिक मंडळ-डोंबिवली, “कविता स्पर्धा – गट क्रमांक १ साठी किंवा २ साठी असे ठळकपणे नमूद करावे. त्यावर स्वतःचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता, मोबाइल नंबर, कवितेचे शीर्षक द्यावे. त्यानंतर संपूर्ण कविता टाइप करावी. शेवटची
पुन्हा स्वतःचे नाव आणि मोबाइल नंबर टाइप करावा. कविता १६ ते २४ ओळींमध्ये असावी. कविता स्वरचित असल्याची लेखी हमी प्रत्येक कवीने कवितेच्या खाली नमूद करावी. कविता टाइप करून एकदाच आणि एकच कविता पाठवावी. आपापल्या गटानुसार पहिल्या गटाकरिता अमिता चक्रदेव (9867086158), तर दुसऱ्या गटाकरिता निशा काळे (9029160630) यांच्याकडे कविता पाठवाव्यात. मात्र कविता ८ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी याच तीन दिवसांमध्ये दिलेल्या व्हॉट्स अॅप क्रमांकावर पाठवायच्या आहेत. त्याआधी पाठविलेली कविता स्पर्धेतून बाद केली जाईल. नियमांचे पालन न करणाऱ्या स्पर्धकाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

स्पर्धेचे बक्षीस वितरण ९ मार्चला होईल. त्याआधी यशस्वी स्पर्धकांना कळविले जाईल. बक्षीस उपस्थित असलेल्याच यशस्वी स्पर्धकाला दिले जाईल. पोस्टाने किंवा कुरियरने घरी पाठविले जाणार नाही. बक्षीस वितरण समारंभाला येताना यशस्वी स्पर्धकाने वयाची ओळख दाखवण्यासाठी आधार कार्डाची सत्यप्रत, शाळेचे ओळखपत्र बरोबर आणावे, असे कळविण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply