हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत पारंपरिक वेशभूषा ठरली लक्षवेधी

रत्नागिरी : हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त रत्नागिरीत आज निघालेल्या स्वागत यात्रेच्या निमित्ताने येथील प्रसिद्ध कांचन डिजिटल फोटो स्टुडिओने आयोजित केलेली पारंपरिक वेशभूषा स्पर्धा लक्षवेधी ठरली.

हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरीत आज गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात आली. यात्रेला अपूर्व प्रतिसाद मिळाला. श्री देव भैरी जुगाई नवलाई पावणाई तृणबिंदुकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था यांनी ही ‘ग्राममंदिर ते समाजमंदिर’ अशी स्वागतयात्रा आयोजित केली होती. रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी मंदिरातून आणि शहरातील मारुती मंदिरातून अशा दोन ठिकाणांवरून निघालेल्या स्वागतयात्रा जयस्तंभ येथे एकत्र आल्या आणि तेथून त्या श्री पतितपावन मंदिराकडे गेल्या. वेगवेगळे संदेश देणारे विविध संस्थांचे चित्ररथ, तसेच लहान मुलांसह विविध वयोगटांमधील स्त्री-पुरुष अनेक देवदेवतांच्या आणि पारंपरिक पोषाखांमध्ये या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.

यानिमित्ताने कांचन डिजिटल फोटो स्टुडिओने आयोजित केलेल्या पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत एकापेक्षा अनेक आकर्षक आणि सरस अशा पारंपरिक वेशभूषेने साऱ्यांनाच खिळवून ठेवले. लक्षवेधी ठरलेल्या स्पर्धकांना आकर्षक सन्माचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सर्व वयोगटासाठी ही स्पर्धा खुली होती. त्यामुळे सर्वच वयोगटातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सहभागी स्पर्धकांमधून उत्कृष्ट वेशभूषा धारण करणाऱ्यांचे परीक्षण कांचन डिजिटल परिवारातील सदस्यांनी केले. शोभायात्रा संपल्यानंतर लगेचच उत्कृष्ट निवडण्यात आलेल्या स्पर्धकांना रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात सन्मानित करण्यात आले. त्यावेळी श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र ऊर्फ मुन्ना सुर्वे, माजी आमदार राजन साळवी, बाबा देसाई, उन्मेष शिंदे,उद्योजक मुकेश गुंदेटा, सामाजिक कार्यकर्ते विजय खेडेकर, सुधाकर सावंत, मरीनर दिलीप भाटकर, राजेश आयरे, भानुशाली, साईजित शिवलकर, दीपक सुर्वे आणि कांचन मालगुंडकर यांच्यासह कांचन डिजिटल फोटो स्टुडिओचे सर्व सदस्य उपस्थित होते.

स्पर्धेत लहान गटाकरिता चार सन्मानचिन्हे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. त्यामध्ये दियांश शिंदे, शांभवी एकेळ, विघ्नेश सनगरे आणि प्रभूश्री रामचंद्र देखावा (देसाई, जोशी, घोटे) यांचा समावेश आहे. मोठा गट स्त्रीवर्ग – राधा देवळे, रुची साळवी, रिया गांधी. मोठा गट पुरुष – नकुल नाडकर्णी, योगेश राईका, रूपेश पेडणेकर. या सर्वांना सन्मानचिन्ह देऊन कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ कडून गौरविण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply