रत्नागिरी : जिल्ह्यात दोन दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरू असून, १७-१८ ऑगस्टला हवामान विभागाने जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता. १९ ऑगस्टला ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाड्यांपासून महाविद्यालयांपर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्थांना १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या मान्यतेने निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला आहे. त्याबद्दलचे पत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. ते पत्रक सोबत दिले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड



